स्थैर्य, फलटण, दि. ६ : हॉटेल अशोका या नावाने लॉज काही दिवसांपूर्वी सुरु करण्यात आलेले होते. त्याला जोडूनच आज पासून व्हेज रेस्टॉरंट, बॅंक्वेट हॉल व डायनिंग हॉल सुरु करण्यात येत आहे. हॉटेल अशोकाची संपूर्ण जबाबदारी स्व. अशोकराव भोईटे यांचे सुपुत्र अमित भोईटे हे यशस्वी रित्या सांभाळतील व आगामी काळात हॉटेल अशोका उज्ज्वल यश संपादन करेल असा विश्वास विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
फलटण येथे हॉटेल ऋतुराजच्या जोडीला सुरू करण्यात आलेल्या हॉटेल अशोका प्युअर व्हेज रेस्टॉरंटच्या उदघाटन समारंभात विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर बोलत होते. या वेळी फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, के. बी. एक्स्पोर्टचे संचालक सचिन यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी श्रीमंत रामराजे म्हणाले की, प्रारंभीच्या काळात विद्यार्थी संघटना, नंतर आरडगावचे उपसरपंच, फलटणचे नगरसेवक, उपाध्यक्ष, नगराध्यक्ष असे गेली ३०/३५ वर्षे सक्रिय राजकारण व समाजकारणात असलेल्या नंदकुमार भोईटे यांनी आपल्या बुद्धिकौशल्य व निर्णयक्षमतेच्या आधाराने सार्वजनिक जीवनातही अनेक चांगले, सेवाभावी, लोकांच्या हिताला प्राधान्य देणारे उपक्रम प्रभावी रीतीने राबविले आहेत. त्यांच्या कुटुंबातील अमित भोईटे यांनी सुरू केलेले हॉटेल अशोका हे सुद्धा दर्जेदार रित्या चालेल यात कसलीही शंका नाही.
सलग ३५ वर्षे नगर परिषदेत निवडून जात असताना शहर विकासाच्या अनेक संकल्पना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविल्या जात असतात व आहेत. फलटण तालुक्यात आलेल्या कृष्णेच्या पाण्याने संपूर्ण तालुका १०० % बागायत होत असताना, कृषी प्रक्रिया उद्योगांची उभारणी, कमिन्स इंटरनॅशनल कंपनीची अनेक युनिट उभी रहात असताना झालेला औद्योगिक विकास, शिक्षण क्षेत्रात उभी राहिलेली नर्सिंग, कृषी, फलोद्यान, अभियांत्रिकी महाविद्यालये, नगर पालिका, बाजार समिती, सहकारी दूध संघ व गोविंद मिल्क प्रॉडक्टस सारख्या खाजगी संस्थांनी केलेली प्रगतीमुळे फलटणचा शहरी भाग वाढत आहे. शहरी भागातील नागरिकांसाठी हॉटेल अशोका नक्कीच पसंतीस उतरेल अशी आशा फलटणचे उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे यांनी व्यक्त केली.
या वेळी माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय अनपट, पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे, नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, नगरसेविका सौ. प्रगती कापसे, सौ. ज्योत्स्ना अनिल शिरतोडे, सौ. दीपाली निंबाळकर, सौ. वैशाली सुधीर अहिवळे, नगरसेवक अजय माळवे, रामराजे युवा मंचचे अध्यक्ष राहुल निंबाळकर, नानासाहेब पवार, यशवंत बँकेचे व्हा. चेअरमन नरेंद्र भोईटे यांच्यासह फलटण तालुक्यातील मान्यवरांची उपस्थिती होती.