दैनिक स्थैर्य | दि. ३ जून २०२३ | बालासोर |
ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी सायंकाळी तीन रेल्वे गाड्यांचा मोठा अपघात झाला आहे. हावडा एक्सप्रेस एका मालगाडीला टक्कर देऊन पुन्हा तिने कोरोमंडल एक्सप्रेस रेल्वेला धडकल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत २३८ लोकांचा मृत्यू झाला आहे तर सुमारे १००० लोक गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफची टीम संयुक्तपणे बचावकार्य करत आहे.
या अपघातात कोरोमंडल एक्सप्रेसच्या ७ बोगींचं नुकसान झालं आहे. त्यामुळे मृतांचा आकडा आणथी वाढण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
ओडिशा राज्याच्या मुख्य सचिवांनी या अपघाताबाबत बोलताना सांगितलं की, आधी हावडा एक्स्प्रेस आणि मालगाडी एकमेकांवर आदळली आणि नंतर कोरोमंडल एक्स्प्रेस मागून आली, त्यामुळे भीषण अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात जखमी झालेल्या इतर प्रवाशांना सोरो सीएचसी, गोपाळपूर सीएचसी आणि खंटापाडा पीएचसीमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या या मार्गावरील सर्व गाड्या थांबवण्यात आल्या आहेत. याशिवाय ३२ जणांची एनडीआरएफ टीम बचावासाठी पाठवण्यात आली आहे.