डॉ. भक्तराज भोईटे यांचा सन्मान


दैनिक स्थैर्य । दि. २८ मे २०२२ । फलटण । निंबळक, ता. फलटणचे सुपुत्र डॉ. भक्तराज महादेव भोईटे यांनी कोविड कालावधीत दिलेल्या अविरत वैद्यकिय सेवेबद्दल त्यांना नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नवी मुंबई रत्न पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. क्रेडाई या बांधकाम क्षेत्रातील संघटनेच्यावतीने डॉ. भोईटे यांना या विशेष पुरस्काराने मंत्री महोदयांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यानंतर अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले.

डॉ. भक्तराज भोईटे हे निवृत्त नायब तहसीलदार महादेव भोईटे, निंबळक यांचे सुपुत्र आहेत.


Back to top button
Don`t copy text!