रुई मध्ये माजी सैनिक व पोलिसांचा सन्मान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १४ ऑगस्ट २०२२ । बारामती । रविवार दि१४ ऑगस्ट रोजी रुई मध्ये ७५व्या भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त प्रा अजिनाथ चौधर यांचे संकल्पनेतून माजी सैनिक, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, ज्येष्ठ स्वातंत्र्याचा सूर्य पाहिलेले पंचाहत्तरी पार जेष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला व तिरंगे झेंडे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष इम्तियाज शिकीलकर ,विद्या प्रतिष्ठानचे प्रा. डॉ गांगुर्डे, मा. नगरसेविका सुरेखा चौधर व रंजना चौधर, अलका चौधर , मछिद्र चौधर,राघू चौधर आदी मान्यवर उपस्थित होते. बालकांना व तरुण पिढीला स्वातंत्र्यपूर्व गोष्टी माहित होणे साठी कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे प्रा अजिनाथ चौधर यानी प्रास्ताविक मध्ये सांगितले तर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन बापू खाडे यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!