ज्येष्ठ रंगभूषाकार श्याम उमरेकर पालकमंत्री कडू यांच्या हस्ते सन्मानित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०६ एप्रिल २०२२ । मुंबई । येथील सह्याद्री फाऊंडेशन या संस्थेतर्फे ज्येष्ठ रंगभूषाकार, नेपथ्यकार श्याम उमरेकर यांना राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक  मागास प्रवर्ग, विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू  यांच्या हस्ते प्रतिष्ठेचा राम जाधव नाट्य तपस्वी पुरस्कार 2022 सोमवारी (दि.4)सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

येथील सांस्कृतिक भवनाच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमास अकोला पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार रणधीर सावरकर  यांचीही उपस्थिती होती. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल वाघ हे उपस्थित होते. याच कार्यक्रमात पालकमंत्री बच्चू कडू यांची मुलाखतही झाली. त्यातून त्यांनी विविध मुद्यांना स्पर्श केले. या कार्यक्रमास नाट्यकलावंत मधू जाधव, प्रशांत राम जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, संयोजक निलेश जळमकर तसेच सांस्कृतिक, नाट्य क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते.

सांस्कृतिक भवन उभारणीत पुढाकार घेणारे पालकमंत्री बच्चू कडू व आ. रणधीर सावरकर यांचा यावेळी कृतज्ञता सन्मान करण्यात आला. तर पालकमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते श्याम उमरेकर यांना राम जाधव नाट्य तपस्वी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.यावेळी विठ्ठल वाघ यांच्या  काव्य भिमायन या अखंड काव्याचे प्रकाशनही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री बच्चू कडू यांची प्रकट मुलाखत निलेश जळमकर यांनी घेतली. या मुलाखतीतून बच्चू कडू यांची राजकीय जडण घडण विविध प्रश्नोत्तरांच्याद्वारे उपस्थितांसमोर उलगडण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!