‘उत्कृष्ट उद्योजक’ पुरस्काराने लगड सन्मानित पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सन्मान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०९ फेब्रुवारी २०२३ । बारामती । महाराष्ट्र शासन व जिल्हा उद्योग केंद्र पुणे यांचे वतीने दिला जाणारा उत्कृष्ट उद्योजक हा पुरस्कार बारामती येथील उद्योजक तथा बारामती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष अविनाश लगड नुकताच प्रदान करण्यात आला.

सदर पुरस्कार पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दि. २६ जानेवारी रोजी देण्यात आला. या पुरस्कारामुळे समाजाप्रती व व्यवसायाप्रति आपली जबाबदारी अजून वाढली आहे, असे मत अविनाश लगड यांनी प्रसंगी व्यक्त केले. मला घडविणारे माझे आजोबा कै. गोविंदराव रामभाऊ लगड यांची मला खूप आठवण येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील त्याकाळी दुष्काळी असणारे कोळगाव गाव आमच्या आजोबांनी १९६५ साली सोडण्याची हिंमत दाखवली नसती तर आज त्याच गावात कुठेतरी शेती करताना दिसलो असतो. आजोबांनी लहानपणापासून जिद्द चिकाटी व धाडस व त्याचबरोबर शिक्षण हे सर्व गुण अंगात असणे किती महत्त्वाचे व गरजेचे आहे, हे सतत मनावर बिंबवले होते. लहानपणी मला घडवायला त्यांच्याबरोबरच माझ्या सर्व आत्या, ज्या त्याकाळी माळेगाव बारामती एस.टी.ने जा ये करून पदवीधर झालेल्या होत्या. त्यांचा देखील मी कायम ऋणी राहील. इंजिनिअरिंग शिक्षणासाठी माळेगाव व भारती विद्यापीठ, पुणे येथे ते पूर्ण करण्यासाठी सहकार्य करणारे व घडवणारे सर्व शिक्षक या सर्वांचे देखील मी ऋण विसरू शकत नाही. ज्यांच्यामुळे मी हा पुरस्कार मिळवू शकलो ते मला व्यवसाय सहकार्य करणारे माझे सर्व पुरवठादार, ग्राहक, मित्रपरिवार, नातेवाईक, हितचिंतक व विविध सरकारी विभागांचे सर्व अधिकारी तसेच विशेष आभार मानायचे म्हणजे आमचे मार्गदर्शक, विरोधी पक्षनेते अजित पवार तसेच मला कायम मार्गदर्शन करणारे आमच्या बारामती सहकारी औद्योगि वसाहत या संस्थेचे चेअरमन रणजीत पवार तसेच आई- वडील व पत्नी यांचे देखील मी ऋण मानतो. हा पुरस्कार म्हणजे आमच्या लगड परिवाराच्या तीन पिढ्यांनी केलेल्या कष्टाचे फळ असल्याचे अविनाश लगड म्हणाले.


Back to top button
Don`t copy text!