दैनिक स्थैर्य | दि. ३० जुलै २०२४ | फलटण | फलटण तालुक्यातील बीबी फाटा ते घाडगेवाडी रस्त्यावर येते वस्ती येथील मुलींना रस्त्यावर पडलेला मोबाईल सापडला होता. त्यानंतर त्या मोबाईलवर फोन आला त्या मुलींनी प्रामाणिकपणे मोबाईल सापडला असल्याचे यावेळी सांगतिले व तो मोबाईल परत मोबाईल मालकाकडे सुपूर्त केला. आताच्या काळामध्ये असा प्रामाणिकपणा बघायला सुद्धा मिळत नाही. त्यामुळे मुलींचे विशेष कौतुक होत आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी कि; आनंद प्रेम पतसंस्था लोणंदचे शाखाप्रमुख प्रशांत शिंदे हे कामानिमित्त बिबी फाट्यावरून घाडगेवाडीकडे जात असताना त्यांचा मोबाईल रस्त्यावर पडला हे त्यांच्या लक्षात आले नाही. त्याचवेळेस येळेवस्ती येथील मुली कु. श्रुती तात्याबा येळे, कु. प्रणाली दत्तात्रय येळे, कु. श्रावणी संतोष येळे, कु. संस्कृती अमोल येळे सरस्वती माध्यमिक विद्यालय, बिबी येथे शाळेत जात असताना त्यांना तो मोबाईल सापडला होता. त्यावेळी त्या मोबाईल वर प्रशांत शिंदे यांनी फोन केला असता त्या मुलींनी फोन सापडल्याचे सांगितले तो फोन मुलींनी प्रामाणिकपणे प्रशांत शिंदे यांना दिला या प्रामाणिक पणाचे कौतुक होत आहे.