दैनिक स्थैर्य | दि. ४ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
गेली २० वर्षे सर्वसामान्य व्यक्ती, गोरगरिबांना अर्थपुरवठा करणारी श्रीमंत निर्मलादेवी नागरी सहकारी पतसंस्थेची २१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी १०.०० वाजता संस्थेच्या कार्यालयात विद्यमान चेअरमन प्रा. सौ. निलम ज्ञानेश्वर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.
संस्थेचे व्यवस्थापक श्री. ज्ञानेश्वर यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. त्यानुसार विषय क्र. १ ते १० बहुमताने संमत करण्यात आले. तसेच विषय क्र.११ चेही वेळी कोणीही सभासदाने प्रश्न न विचारल्याने हा विषयदेखील बहुमताने संमत करण्यात आला.
प्रास्ताविकामध्ये विद्यमान चेअरमन यांनी संस्थेच्या कार्याचा थोडक्यात आढावा घेतला. अहवाल सालात संस्थेचे १५७० सभासद असून संस्थेचे भागभांडवल रु. एक कोटी असून विविध प्रकारच्या ठेवीमध्ये रु. ७ कोटी १६ लाख ५४ हजार २५० रुपये २८ पैसे एवढी गुंतवणुक केली असून संस्थेने विविध प्रकारच्या कर्जापोटी ५ कोटी ८२ लाख ४८ हजार एक रुपये एवढे कर्ज वाटप केले आहे. अहवाल सालात १ कोटी ९५ लाख २५ हजार ६३३ रुपये ७५ पैसे एवढी गुंतवणूक केली असून संस्थेस एकूण नफा रु. ५ लाख २६ हजार १४२ रुपये ७४ पैसे झाला असून सहकाराच्या नियमानुसार तरतुदी केल्यानंतर सभासदास ६ % लाभांश देण्यासाठी रु. २ लाख २६ हजार १४२ रु. ७४ पैसे एवढ्या रकमेची तरतूद केली आहे. संस्थेचे कामकाजामध्ये सेवकांचाही सहभाग महत्त्वाचा आहे. त्यांनी प्रामाणिकपणे काम केले व संचालक मंडळाची मिळालेली साथ यामुळे संस्था प्रगतीपथावर आहे.
संस्थापक चेअरमन मुधोजी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य श्री. विश्वासराव देशमुख यांनी वर्षात संस्था रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करणार असून त्यावेळी संस्थेच्या ठेवी या २५ कोटींपर्यंत गेल्या पाहिजेत, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. संस्था स्थापनेच्या वेळी विधान सभेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे बहुमोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले, असे गौरवोद्गार देशमुख यांनी काढले.
सभेस सर्व संचालक व सभासद उपस्थित होते. या सभेची सांगता संचालक प्रा. डॉ. बाळासाहेब कांबळे यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.