वाजेगाव येथून होंडा शाईन मोटारसायकल चोरीला

घराशेजारील शेडमध्ये लावलेली गाडी अज्ञात चोरट्याने पळवली; फलटण ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल


स्थैर्य, फलटण, दि. ०६ ऑगस्ट : वाजेगाव (ता. फलटण) येथे घराशेजारील शेडमध्ये पार्क केलेली होंडा शाईन मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी फिर्यादी गोविंदराव रामचंद्र सुर्वे यांनी दिलेल्या तक्रारीवरून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोविंदराव सुर्वे (रा. वाजेगाव) यांनी दि. २८ जुलै रोजी आपली होंडा शाईन मोटारसायकल (क्र. एमएच ११ डीएफ ५२६७) नेहमीप्रमाणे घराशेजारील शेडमध्ये लावली होती. रात्री साडेअकरा वाजेपर्यंत त्यांची गाडी जागेवर सुस्थितीत होती.

दुसऱ्या दिवशी, दि. २९ जुलै रोजी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास, फिर्यादी यांना त्यांची मोटारसायकल जागेवर दिसली नाही. त्यांनी तात्काळ आजूबाजूच्या परिसरात, तसेच मित्र आणि नातेवाईकांकडे गाडीचा शोध घेतला, परंतु ती कुठेही मिळून आली नाही. आपली गाडी चोरीला गेल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.

गोविंदराव सुर्वे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सागर अभंग करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!