दैनिक स्थैर्य | दि. २१ सप्टेंबर २०२३ | फलटण |
‘होमिओपॅथी उपचार’ ही काळाची गरज आहे. या उपचार पद्धतीमुळे दीर्घ आजार, दुर्धर आजार नियमितपणे औषध उपचारांनी बरे होतात. नागरिकांनी या उपचार पद्धतीचा उपयोग करून घ्यावा, असे प्रतिपादन आ. जयकुमार गोरे यांनी केले.
फलटण येथील डी.एड्. चौकात डॉ. शिवानी नाळे यांनी नव्याने सुरू केलेल्या ‘जय शंकर होमिओपॅथी क्लिनिक’चे उद्घाटन माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष फलटण-कोरेगावचे आ. दीपक चव्हाण मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, शिवानी नाळे यांनी पुणे येथे यशस्वीपणे प्रॅक्टिस केलेले आहे. होमिओपॅथीचा उपचार हा कायमस्वरूपी आजार बरा करणारा उपचार आहे. त्यामुळे या उपचार पद्धतीचा डॉ. शिवानी नाळे यांच्या जय शंकर होमिओपॅथिक क्लिनिकच्या माध्यमातून लाभ घ्यावा.
या कार्यक्रमास श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेडे, विडणीचे सरपंच सागर अभंग, श्रीराम कारखान्याचे संचालक साबळे, महाराष्ट्र माळी संघाचे जिल्हाध्यक्ष, महामित्रचे संपादक श्री. दशरथ फुले, माजी कृषी अधिकारी श्री. कुंडलिक नाळे, नरसोबा पतसंस्थेचे मॅनेजर श्री. रवींद्र नाळे, सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन श्री. राजेंद्र बोराटे, व्हाईस चेअरमन श्री. विजय बनसोडे, माजी व्हाईस चेअरमन सुरेश शशिकांत सोनवलकर, जिल्हा शिक्षक समितीचे उपाध्यक्ष श्री. सुरेंद्र घाडगे सर, सर्व शिक्षक संघटनांचे जिल्हा-तालुका पदाधिकारी, शिक्षक उपस्थित होते.
प्रास्ताविक श्री. उदयकुमार नाळे यांनी केले तर सूत्रसंचालन श्री. आनंदराव सोनवलकर यांनी केले.