सजाई गार्डनमध्ये होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे आज आयोजन


दैनिक स्थैर्य | दि. २५ ऑक्टोबर २०२१ | फलटण | गोविंद मिल्क अँण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा.लि.फलटण व शंकर मार्केट व्यापारी युवक मंडळ, फलटण यांचे संयुक्त विद्यमाने गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कृत विश्‍वविक्रम विजेता नितीन गवळी यांच्या गप्पा, गाणी, नृत्य, विनोद, कविता, नकला या सर्वांनी परिपूर्ण असणारा व नवनविन खेळांसाठी सज्ज असणारा ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाचे आयोजन आज दि. २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता करण्यात आले आहे. तरी फलटण शहरातील महिलांनी सजाई गार्डन येथे सायंकाळी ५.३० वाजता उपस्थित रहावे असे आवाहन शंकर मार्केट व्यापारी युवक मंडळाच्या वतीने नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर व नगरसेविका सौ. प्रगती कापसे यांनी केलेले आहे.


Back to top button
Don`t copy text!