गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा; फलटण भाजपा कडून मागणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि.२२: महाराष्ट्र सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा निषेध करीत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा द्यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आलेली आहे.

भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते ना. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली व माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे सुचनेनुसार सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, फलटण शहराध्यक्ष अमोल सस्ते, नगरसेवक अशोक जाधव, बजरंग गावडे यांनी फलटणचे तहसिलदार समीर यादव यांना या बाबत सविस्तर निवेदन देण्यात आले.

राज्याचे गृहमंत्री ना. अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये दरमहा हप्ता गोळा करण्याचे काम निलंबित पोलीस उपनिरीक्षक सचिन वाझे यांच्यावर सोपवल्याची खळबळजनक आरोप माजी मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केलेले आहेत. ही बाब गंभीर असून महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. या भ्रष्टाचारी मंत्र्यांचा आम्ही जाहीर निषेध करीत असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देशमुख यांचा राजीनामा त्वरित घ्यावा. असेही निवेदनात स्पष्ट केले आहे.

यावेळी नगरसेवक सचिन अहिवळे, धनंजय पवार, सुनील जाधव, तानाजी करळे, सौ. मुक्ती शहा, सौ. उषा राऊत, नितिन वाघ, बंडु मदने, सुखदेव खटके, शशिकांत रणवरे, राहुल शहा यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!