स्थैर्य, फलटण, दि. ०९ : नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. ४ व ५ मधील तब्बल १५७० कुटुंबांना या कडक लॉकडाऊनमध्ये पुरेल इतपत अन्नधान्याचे किट माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांनी दिले आहे. दरम्यान, मलठण व परिसरातील नागरिकांच्या सेवेसाठी आपण कटिबद्ध असल्याचे गुंजवटे यांनी स्पष्ट केले आहे.
गुंजवटे यांनी प्रभाग क्र.४ व ५ मधील १५७० कुटुंबांना ५ किलो गहू, ५ किलो तांदूळ, १ किलो तूरडाळ, २ किलो पोहे, १ किलो शेंगदाणा, २ किलो साखर, १ लिटर तेल, १ किलो कांदा लसूण चटणी असे ८ प्रकारच्या अन्नधान्यातील उपयोगी किराणामालाचे किट देण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रेरणेने आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाने आपण मलठण व परिसराला करोनासारख्या महामारीच्या काळात सर्वतोपरी सहाय्य करण्यास प्रयत्नशील असल्याचे गुंजवटे यांनी स्पष्ट केले.