राज्यपालांच्या उपस्थितीत होलोकॉस्ट दिन प्रार्थना सभा संपन्न; विविध देशांचे वाणिज्यदूत उपस्थित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २७ एप्रिल २०२२ । मुंबई । दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाझी जर्मनी कडून मारल्या गेलेल्या लाखो निरपराध ज्यू लोकांच्या स्मरणार्थ मुंबई येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत होलोकॉस्ट स्मृतिदिनानिमित्त एका प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले.

ज्यू धर्मियांच्या काळाघोडा मुंबई येथील केनिसेथ इलियाहू सिनेगॉग या ऐतिहासिक प्रार्थनास्थळाच्या ठिकाणी मंगळवारी (दि. 26) या प्रार्थनासभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी राज्यपालांसह विविध देशांच्या वाणिज्यदूतांनी मृतांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मेणबत्ती लावली व त्यांना आपली आदरांजली वाहिली.

प्रार्थनासभेला ससून ट्रस्टचे अध्यक्ष सॉलोमन सॉफर, शारे रेशन सिनेगॉगचे अध्यक्ष जुडा सॅम्युअल, इस्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत कोबी शोशानी, फ्रांसचे वाणिज्यदूत जॉन मार्क सेर शॉर्ले, अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत डेव्हिड जे रांझ, तसेच संयुक्त अरब अमिराती, रशियन फेडरेशन, अर्जेंटिना, इटली, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, हंगेरी, आइसलँड, आयर्लंड, जपान, नेदरलँड्स, पोलंड, स्वीडन, स्पेन, जर्मनी, दक्षिण आफ्रिका व ब्रिटनचे वाणिज्यदूत वा त्यांचे प्रतिनिधी तसेच ज्यू नागरिक उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!