
यंदा फाल्गुन पौर्णिमेला, म्हणजेच ३ मार्च रोजी चंद्रग्रहण असल्याने ‘होलिका दहन’ एक दिवस आधी, म्हणजेच २ मार्च २०२६ रोजी केले जाणार आहे. फलटणचे सुप्रसिद्ध ज्योतिष भास्कराचार्य श्री प्रकाशसर यांनी याबाबत सविस्तर शास्त्रीय माहिती दिली आहे.
स्थैर्य, फलटण, दि. 26 फेब्रुवारी : होळीचा सण जवळ आला असून यंदा ‘होलिका दहन’ नेमके कधी करायचे, याबाबत भाविकांमध्ये संभ्रम असू शकतो. मात्र, यंदा ३ मार्च रोजी ‘चंद्रग्रहण’ येत असल्याने, शास्त्र आणि ‘धर्मसिंधू’मधील विशेष वचनानुसार यावर्षी सोमवार, दि. २ मार्च २०२६ रोजीच ‘होलिका दहन’ करण्यात येणार आहे. फलटण व पुणे येथील सुप्रसिद्ध ज्योतिष भास्कराचार्य आणि वास्तुतज्ज्ञ श्री प्रकाशसर यांनी पंचांग आणि शास्त्रवचनांचा आधार घेत याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे.
२ मार्च रोजीच होलिका दहन का?
श्री प्रकाशसर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी दि. २ मार्च २०२६ रोजी (सोमवारी) फाल्गुन शुक्ल चतुर्दशीची समाप्ती सायंकाळी १७:५६ वाजता होत आहे. त्यानंतर प्रदोषकाळात पौर्णिमा सुरू होत आहे.
दुसऱ्या दिवशी, म्हणजेच मंगळवारी ३ मार्च रोजी पौर्णिमा सायंकाळी १७:०८ वाजेपर्यंतच असणार आहे. ३ मार्च रोजी ‘ग्रस्तोदित चंद्रग्रहण’ आहे. विशेष म्हणजे, या दिवशी ग्रहणकाळ आणि प्रदोषकाळ सुरू होण्यापूर्वीच पौर्णिमा समाप्त होत आहे.
‘धर्मसिंधू’चा नेमका नियम काय सांगतो?
या ग्रहणाच्या स्थितीमुळे ‘धर्मसिंधू’ या धर्मशास्त्रावरील प्राचीन ग्रंथामध्ये दिलेल्या विशेष वचनाचा आधार घेण्यात आला आहे.
“इदं चंद्रग्रहणसत्वे वेधमध्ये कार्यं ग्रस्तोदये परदिने प्रदोषे पूर्णिमासत्वे ग्रहणमध्य एव कार्यम् । अन्यथा पूर्वदिने । धर्मसिंधु“
या वचनानुसार, जर ग्रहणकाळात पौर्णिमा नसेल तर आदल्या दिवशी होलिका दहन करावे लागते. म्हणूनच, ३ मार्च ऐवजी २ मार्च २०२६ रोजीच होलिका दहन निश्चित करण्यात आले आहे.
‘भद्रा’ काळ असला तरी होलिका दहन शक्य!
पंचांगानुसार, २ मार्च रोजी सोमवारी सायंकाळी १७:५६ ते रात्री २९:२९ पर्यंत (संपूर्ण रात्र) ‘भद्रा’ काळ आहे. मात्र, अशा वेळेस प्रदोषकाळात भद्रा असली, तरीही शास्त्रानुसार २ मार्च रोजी होलिका दहन करता येते, अशी महत्त्वपूर्ण माहितीही श्री प्रकाशसर यांनी दिली आहे.
अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी संपर्क:
-
मार्गदर्शक: श्री प्रकाशसर (ज्योतिष भास्कराचार्य व वास्तुतज्ञ)
-
कार्यालय: फलटण व पुणे
-
संपर्क क्रमांक: 8766772427 / 9850065757

