
दैनिक स्थैर्य । दि.२० मार्च २०२२ । फलटण । सरस्वती शिक्षण संस्था संचलित विद्यार्थांच्या विविध कलागुणांना वाव देणाऱ्या प्रोग्रेसिव्ह काॅन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज,गुणवरे येथे होळी सण साजरा करण्यात आला.
यावेळी प्रशालेच्या इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी होळीचे महत्व सांगणारी होलिका दहन ही कथा सादर केली. प्रशालेत होळी पूजन करून वाईट गोष्टींचे दहन करण्याचा संदेश दिला.विद्यार्थ्यांनी विविध रंगांची उधळण करून होळीचा आनंद लुटला. या कार्यक्रमास सरस्वती शिक्षण संस्थेचे सचिव मा.श्री.विशाल पवार सर ,संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका मा.सौ. संध्या गायकवाड मॅडम,संस्थेच्या संचालिका मा.सौ.प्रियांका पवार मॅडम यांनी विद्यार्थ्यांना होळी,धूलिवंदन व रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. दुसरीतील विद्यार्थ्यिनी कु. आयेशा शेख हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व कु.अदिती भगत हिने आभारप्रदर्शन केले. प्रशालेचे मुख्याध्यापक मा.श्री.सुनिल अहिरे सर,प्रशालेचे पर्यवेक्षक मा.श्री.किरण भोसले सर,समन्वयिका मा.सौ.सुप्रिया सपकाळ मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली होळी सण आनंदात संपन्न झाला.