दैनिक स्थैर्य । दि. १९ मार्च २०२२ । फलटण । होळी हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे . होळी हा संपूर्ण भारतात साजरा केला जातो. फलटण तालुक्यातील सोनगाव मधील सर्व तरुण मंडळ व ग्रामस्थ यांनी एकत्र येऊन उत्साहात होळी साजरी केली. हनुमान मंदिर येथील साफसफाई करून तेथील पालापाचोळा दहन करत स्वछतेचा संदेश दिला, तरुणांमध्ये व्यसनमुक्ती व्हावी यासाठी गुटख्याची कागदे, सिगारेटची पाकिटे होळीत दहन केली.
त्याचबरोबर सकारात्मक विचार अंगी येऊन नकारात्मक विचारांची होळी व्हावी, कोरोनारुपी राक्षसाचे दहन व्हावे, अपप्रवृत्तीचा नाश व्हावा. ही इच्छा होळीचे पूजन करताना व्यक्त केली.
होळीचे पूजन नवनिर्वाचित पोलीस पाटील दीपक लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी सरपंच पोपटराव बुरुंगले, प्रा. राजेश निकाळजे, राजेंद्र आडके, महादेव कांबळे, राजेंद्र लोंढे, रमेश मदने, राहुल गायकवाड, दिलीप भंडारे, दिलीप गायकवाड, नारायण तुपे, बाळासो यादव, राहुल यादव, अनिल रिटे, सुरेश पवार, बाजीराव निकाळजे, श्री उत्तम शेंडे, अमर टेंबरे व इतर सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.