दैनिक स्थैर्य । दि. १७ मे २०२३ । सातारा । सातारा जिल्हा कारागृहातील सर्व बंद्यांचे दि. 15 मे ते 14 जून 2023 पर्यंत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले असून दि. 15 मे पासून शिबीरास सुरुवात करण्यात आली. जिल्हा शासकीय रुग्णालय, सातारा यांच्या सहकार्याने “कारागृहातील बंद्यांची एकात्मिक गुप्तरोग तपासणी, एचआयव्ही चाचणी, क्षयरोग चाचणी, कावीळ चाचणी” अशी “चाचणी मोहिम” आयोजित करण्यात आली आहे. सदर मोहिमेत कारागृहातील बंद्यांची दररोज वैद्यकीय तपासणी करून घेण्यात येत आहे.
या चाचणी मोहिमेसाठी जिल्हा एड्स नियंत्रण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंत भोसले, जिल्हा समन्वयक पुंडलिक पाटील, डॉ. प्रज्ञा गांधी, समुपदेशक श्रीमती सुनंदा शिंगटे, समुपदेशक सचिन जाधव, प्रयोगशाळा तंत्रज्ञ रूपाली कदम, एनसीडी स्टाफ सारिका माने, परमेश्वर बोरकर उपस्थित होते. त्यांच्या माध्यमातून कारागृहात असलेल्या सर्व बंद्यांची तपासणी होत असून दररोज कारागृहात नवीन दाखल होणाऱ्या बंद्यांची तपासणी होणार आहे.
या विशेष तपासणी मोहिमेच्या शुभारंभावेळी कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी राजेंद्र भापकर, तुरुंग अधिकारी सुप्रिया कुंटे, महिला शिपाई रेश्मा गायकवाड, प्रीती पाटोळे, अहमद संदे, नानासो डोंगळे, महेंद्र सोनवणे, माणिक बागल, ज्योती शिंगरे व इतर कर्मचारी उपस्थित होते.