सातारा जिल्ह्याचा मंत्रिपदाचा इतिहास; शिवेंद्रसिंहराजे, शंभूराज, जयकुमार, मकरंद पाटील कॅबिनेटपदी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १६ डिसेंबर २०२४ | फलटण |
नागपूर येथे पार पडलेल्या महायुती सरकारच्या मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यात रविवारी सातारा जिल्ह्याने इतिहास रचला. जिल्ह्यातील चार आमदारांनी राज्याचे ‘कॅबिनेट मंत्री’ म्हणून शपथ घेतली. तसेच दोन्ही उपमुख्यमंत्रीही सातारा जिल्ह्यातीलच असून आता आणखी चार मंत्र्यांची वर्णी लागल्याने इतिहास घडला आहे. राज्याच्या मंत्रिमंडळात आता सर्वाधिक मंत्री सातार्‍याचे आहेत. रविवारी सातारा जिल्ह्यातील ना. शिवेंद्रराजे भोसले, ना. शंभूराज देसाई, ना. जयकुमार गोरे, ना. मकरंद पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मूळचे दरे खुर्द (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे मूळचे नांदवळ (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथील आहेत. त्यामुळे राज्याच्या मंत्रिमंडळात आता सातारा जिल्ह्याचा दबदबा राहणार, हे नक्की!

‘कॅबिनेट मंत्री’ म्हणून भाजपातून आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आ. मकरंद पाटील, तर शिवसेना शिंदे गटातून आ. शंभूराज देसाई यांची वर्णी लागली आहे.

शरद पवारांचा ‘बालेकिल्ला’ समजला जाणारा सातारा जिल्हा विधानसभा निवडणुकीत ढासळला. जिल्ह्यातील महायुतीतील भाजपाचे चार, अजित पवार गटाचे २ आणि शिवसेना शिंदे गटाचे २ असे महायुतीचे सर्वच्या सर्व आठ आमदार निवडून आले. त्यानंतर जिल्ह्यातील कोणाची मंत्रिपदी वर्णी लागणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या.

सातारा जिल्ह्यातील चार आमदारांची मंत्रीपदी वर्णी लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. पहिल्यांदाच जिल्ह्याला चार मंत्रिपदे मिळाली असल्याने जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला.

१९८८ मध्ये स्व. अभयसिंहराजे भोसले यांना कॅबिनेट दर्जाचे सहकारमंत्री पद मिळाले होते. त्यानंतर शिवसेना-भाजप युती शासनाच्या काळात १९९९ पर्यंत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हेही ‘महसूल राज्यमंत्री’ म्हणून कार्यरत होते. यानंतर सातार्‍याला पुन्हा मंत्रिपद मिळाले नव्हते. मात्र, २०२४ च्या निवडणुकीत राज्यात दोन नंबरच्या मताधिक्याने निवडून आलेल्या आ. शिवेंद्रराजे भोसले यांना महायुती सरकारने संधी दिली. रविवारी बाबाराजेंनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर सातारा व फलटणमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला.


Back to top button
Don`t copy text!