स्थैर्य, अहमदाबाद, दि.२६: भारत आणि इंग्लंडदरम्यान डे-नाइट कसोटी अमहमदाबादमधील मोटेरा स्टेडियममध्ये सुरू आहे. भारताला इंग्लंडने विजयासाठी अवघे 49 धावांचे आव्हान दिले. दरम्यान, टीम इंडियाचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनने या कसोटीत इतिहास घडवला आहे. इंग्लंडच्या दुसऱ्या इनिंगमध्ये जोफ्रा आर्चरची विकेट घेत अश्विनने टेस्ट क्रिकेटमध्ये 400 विकेट घेण्याचा टप्पा गाठला आहे.
टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद 400 विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत अश्विन दुसऱ्या क्रमांकावर आहे. अश्विनने 77 व्या टेस्टमध्ये 400 विकेट पूर्ण केल्या आहेत. अश्विन जगात सर्वात वेगवान 400 विकेट घेण्याच्या यादीत श्रीलंकेच्या मुथैया मुरलीधरननंतर दुसऱ्या नंबरवर आहे. मुरलीधरनने 72 व्या टेस्टमध्ये 400 विकेट घेतल्या होत्या. शिवाय, सर्वात जलद 400 विकेटपर्यंत जाण्याचा भारतीय रेकॉर्ड अनिल कुंबळेचा नावे होता. कुंबळेने 85 व्या टेस्टमध्ये 400 विकेट पूर्ण केल्या होत्या. भारताकडून सगळ्यात जलद 400 विकेट घेण्याचा विक्रम आता अश्विनच्या नावावर झाला आहे.