दैनिक स्थैर्य । दि. २१ मे २०२२ । मुंबई । इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनामधील दोन विशेषीकृत कंपन्या आघाडीची भारतीय इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी ओकिनावा ऑटोटेक आणि इटालियन इलेक्ट्रिक व परफॉर्मन्स मोटरसायकल्स उत्पादक कंपनी टॅसिटा यांच्यामध्ये नुकताच ऐतिहासिक करार करण्यात आला. या संयुक्त उद्यमामधून स्थापना करण्यात आलेली कंपनी भारतामध्ये स्थित असेल आणि २०२३ पासून भारतामधून उत्पादनाला सुरूवात करेल.
या नवीन संयुक्त उद्यमाचा मुख्य उद्देश दोन्ही कंपन्यांसाठी जीवाश्म इंधनांचा वापर कमी करण्याचा, तसेच स्वत:ला इलेक्ट्रिक दुचाकीच्या विश्वामध्ये अव्वल कंपनी म्हणून स्थापित करण्याचा आहे. विशेषत: ओकिनावा इलेक्ट्रिक दुचाकींच्या वर्षानुवर्षे उत्पादन व विक्रीमुळे भावी उत्पादन व त्यांच्या प्रॉडक्शन लाइनचा स्थानिक विकास करेल. टॅसिटा प्रखर स्थितींमध्ये १० वर्षांचे संशोधन व विकास आणि चाचणीच्या अनुभवासह पॉवरट्रेन – कंट्रोलर, मोटर, बॅटरी पॅक्स व बीएमएस देईल, ज्यामुळे ते अत्याधुनिक उच्च-कार्यक्षम उत्पादनांच्या निर्माणामध्ये निपुण होतील.
या संयुक्त उद्यमामध्ये दोन उत्पादन लाइन्सचा समावेश असेल: स्कूटर्स व मोटरसायकल्स. दोन्ही लाइन्स स्थानिक व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांसाठी आहेत. वर्ष २०२३ रेंजमध्ये स्कूटर व उच्च कार्यक्षम मोटरसायकलचा समावेश असेल. संपूर्ण रेंजमध्ये ओकिनावा तंत्रज्ञान असलेल्या बाजारपेठेतील सर्वोत्तम कनेक्टीव्हीटी यंत्रणा असतील.
ओकिनावा ऑटोटेकचे व्यवस्थापकीय संचालक व संस्थापक जीतेंदर शर्मा म्हणाले, “टॅसिटाचे मिशन आमच्या शाश्वतपूर्ण भविष्य निर्माण करण्याच्या ध्येयाशी संलग्न आहे. आम्ही आशा करतो की, हा सहयोग समन्वयित प्रभाव निर्माण करेल, जो इलेक्ट्रिक गतीशीलतेप्रती आमच्या कटिबद्धतेला चालना देईल. ग्राहक प्राधान्यक्रमांमध्ये स्थिरगतीने व जागरूक बदल होत आहे आणि भारतात प्रिमिअम व परफॉर्मन्स इलेक्ट्रिक मोटरसायकल्सप्रती वाढती मागणी दिसून येत आहे. टॅसिटा आम्हाला भावी तंत्रज्ञान व उत्पादनांची मागणीची पूर्तता करणारे बाजारस्थळ निर्माण करण्यामध्ये मदत करेल. त्यांचे प्रगत व भावी तंत्रज्ञान आमच्या विद्यमान उत्पादन रेंजमध्ये अधिक वाढ करण्यासोबत प्रबळ करेल.”
टॅसिटाचे व्यवस्थापकीय संचालक पिअरपॅओलो रिगो म्हणाले, “आम्हाला भारतातील आघाडीच्या ई-स्कूटर उत्पादक कंपनीसोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे. ओकिनावा ऑटोटेकच्या लीडरशीप टीमला संपन्न ऑन-ग्राऊण्ड अनुभव असण्यासोबत बाजारपेठ, स्पर्धा व ग्राहक वर्तणूकीबाबत माहित आहे. आम्हाला उच्च स्तरीय बाइक्स लॉन्च करण्यासाठी प्रिमिअम ईव्ही बाइक विभागामधील आमचे कौशल्य देण्याचा आनंद होत आहे. आमच्या टीमसह ओकिनावा इंजीनिअर्स भविष्याला परिभाषित करणारी अद्वितीय उत्पादन तत्त्वे सादर करण्यासाठी आरअॅण्डडीप्रती समर्पित आहे.”
नवीन स्थापना करण्यात आलेल्या कंपनीच्या पुढील प्रयत्नामध्ये २०२२ दरम्यान २०२३ च्या पहिल्या सहामाहीत सादर करण्यात येणारी डिझाइन, विकास, पेटेण्टिंग व रस्त्यावर चाचण्यांचा समावेश असेल, जे ओकिनावा व्यावसायिक टेक्निशियन्स व इटालियन टीमकडून करण्यात येईल. हिवाळ्यामध्ये पडणारे धुके ते भारतातील पावसादरम्यानची आर्द्रता अशा सर्व वातावारणीय स्थितींमध्ये रस्त्यावर चाचण्या घेण्यात येतील. चाचण्यांच्या काही भागांमध्ये भारतातील ओकिनावा मुख्यालयापासून इटलीतील टॅसिटा मुख्यालयापर्यंतच्या उद्घाटनाच्या प्रवासाचा समावेश असेल. दोन्ही कंपन्यांसाठी उद्देश अधिकतम ग्राहक समाधानासाठी अत्यंत विश्वसनीय, उत्साहवर्धक व उपयुक्त उत्पादने देण्याचा आहे आणि नेहमीच राहिला आहे.