‘त्यांची आणि आमची जुनी ओळख!’, अजित पवारांचा परिचय अन् जयंत पाटलांची मिश्किल टिप्पणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १७ जुलै २०२३ । मुंबई । विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून (दि.17) सुरुवात झाली आहे. यंदाच्या अधिवेशनात राज्याच्या राजकारणात पहिल्यांदाच शिवसेना आणि राष्ट्रवादीचे  दोन गट समोरासमोर आले आहेत. दोन्ही पक्षातील काही आमदार सत्ताधारी बाकांवर तर काही विरोधी बाकांवर आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच अजित पवारांसह नऊ मंत्री सरकारमध्ये सामील झाले. आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचा परिचय करुन देत असताना मजेशीर गोष्ट घडली.

सभागृहाचे कामकाज सुरू झाल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नवनियुक्त मंत्र्यांचा परिचय करण्यास सांगितले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे राहून नव्या मंत्र्यांची नावे आणि त्यांच्या खात्याची माहिती सभागृहाला देत होते. एकनाथ शिंदेंनी अजित पवारांचा परिचय करुन देताना उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री म्हटले.

मुख्यमंत्र्यांनी परिचय करुन देताच अजित पवारांनी उभं राहून सगळ्यांना नमस्कार केला. अजित पवार बसत असतानाच समोर विरोधी बाकांवर बसलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी मिश्किलपणे ‘त्यांची-आमची जुनी ओळख आहे’ म्हणत कमेंट केली आहे. जयंत पाटलांच्या टिप्पणीने सभागृहात एकच हशा पिकला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी इतर मंत्र्यांचा परिचय सभागृहाला करुन दिला.


Back to top button
Don`t copy text!