
स्थैर्य, सातारा, दि. १९: येथील जम्बो कोवीड सेंटरसमोर पार्क केलेली सुरक्षा रक्षकाची हिरोहोंडा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत माहिती अशी, जंबो कोवीड सेंटरच्या पार्किंगमध्ये सुरक्षा कर्मचारी सागर बबन नलवडे रा. 30 यांनी हिरोहोंडा युनिकॉन पार्क केली होती. या दुचाकीचे हँडल लॉक तोडून चोरट्याने गाडी चोरून नेली. यप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तपास म. पो. ना. जाधव करत आहेत.