हिंगणगाव कोरोनामुक्त; विलगीकरण केंद्रात शून्य रुग्ण


स्थैर्य, फलटण दि.15 : हिंगणगाव (ता.फलटण) येथील कोरोना विलगीकरण केंद्रातील अखेरच्या रुग्णास झाडाचे रोप भेट देवून निरोप देण्यात आला असून आता या विलगीकरण केंद्रात उपचारार्थ एकही रुग्ण नसल्याने गाव कोरोनामुक्त झाल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे. हिंगणगांव ग्रामपंचायत, सर्व आपत्ती व्यवस्थापन समिती, समस्थ ग्रामस्थ मंडळ, गावातील सर्व नवतरुण मंडळ, तसेच विलगिकरण कक्षास अन्नदान करणारे सर्व अन्नदाते या सर्वांच्या एकजुटीमुळे हे शक्य झाले आहे.

गावातील डॉ.निंबाळकर,डॉ.भापकर, डॉ.अजिता आणि डॉ.राहूल माने यांच्यासह सर्व आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी, स्वयंसेवक यांच्यासह अहोरात्र मेहनत घेणारे प्रदिप भोईटे, मनोज ढमाळ या सर्वांचे हिंगणगाव कोरोना दक्षता समिती व ग्रामस्थांकडून आभार मानण्यात आले.


Back to top button
Don`t copy text!