फलटणच्या परंपरेनुसार हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकोप्याने रमजान ईद साजरा करावा : श्रीमंत रघुनाथराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. २५ : कोरोना विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र काळजीचे वातावरण असल्याने सामाजिक संवेदना आणि कर्तव्याचा भाग म्हणून रमजान ईदचा सण साधेपणाने साजरी करावा, घरातच नमाज पठण करावे, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी केले.  मुस्लीम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देताना ते म्हणाले की, दरवर्षी आपण राजवाड्यात फलटण संस्थानच्या परंपरेप्रमाणे हिंदू मुस्लीम एकत्र येवून रमजान ईद साजरी करतो. परंतु यावर्षी कोरोना विषाणूमुळे आपली परंपरा खंडीत होत आहे पण आपत्ती संपुष्टात आल्यानंतर आपण परंपरेप्रमाणेच मोठ्या आनंदात ईद साजरी करुया. रमजानच्या पवित्र महिन्यात केलेले रोजे (उपवास) ईदच्या दिवशी सोडले जातील. दर वर्षी मित्र परिवार, शेजार्‍यांसमवेत मोठ्या उत्साहात साजरी केली जाणारी ईद यावर्षी साधेपणाने साजरी करावी. कोरोना मुळे रोज नागरिक मृत्युमुखी पडत असताना सामाजिक भान राखून साधेपणाने राहावे, सर्वांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करावी, असे आवाहन  श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!