जी-२० च्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा युवकांशी संवाद

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १६ जानेवारी २०२३ । पुणे । राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणाऱ्या जी-२० परिषदेच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे, प्र- कुलगुरू डॉ.संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे, व्यवस्थापन परिषद सदस्य रविंद्र शिंगणापूरकर आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, भारताच्या नेतृत्वात जी-२० परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. जी-२० परिषदेच्या माध्यमातून आपले भविष्य घडविण्यासाठी आपल्याला मिळालेली संधी आहे, असे त्यांनी सांगितले. जी-२० आणि भारत तसेच देशातील तरुण पिढीचा असणारा संबंध मांडून भारत देश कशा पद्धतीने जगाचे नेतृत्व करण्यास तयार झाला आहे याची माहिती त्यांनी दिली.

आविष्कार नगरीत सादर करण्यात आलेल्या संशोधन प्रकल्पांना भेट देऊन त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यशस्वी संशोधन प्रकल्पांची उद्योग क्षेत्राशी सांगड घालून स्टार्टअपसाठी सर्वोतोपरी मदत केली जाईल, श्री. पाटील म्हणाले.

यावेळी श्री. पाटील यांनी एकूणच जी -२० च्या पार्श्वूमीवर विद्यापीठाने केलेल्या तयारीचा आढावा घेतला. नवनियुक्त अधिकार मंडळांच्या प्रतिनिधींशी चर्चादेखील केली. तसेच स्पर्धेतील परिक्षकांशीदेखील संवाद साधला.


Back to top button
Don`t copy text!