दैनिक स्थैर्य । दि.०३ फेब्रुवारी २०२२ । फलटण । जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., हुपरी संचलित श्रीराम सहकारी साखर कारखाना लि., फलटण मध्ये दि. १ ते १५ जानेवारी अखेर गाळप झालेल्या ४९२२३.६९८ मे. टन ऊसाचे एफआरपी प्रतिटन २७६१ रुपये प्रमाणे १३ कोटी ५९ लाख ६ हजार ६३० रुपये ऊस पेमेंट दि. २८ रोजी संबंधीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. दि. १६ ते ३१ डिसेंबर अखेर ऊस तोडणी वाहतूक पेमेंट रक्कम रुपये २ कोटी ९२ लाख ७०हजार २८७ दि. २० जानेवारी रोजी संबंधीत ठेकेदार यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहे. यावर्षी गाळप हंगाम दि.१२ नोव्हेंबर २०२१ रोजी सुरु झाला असून ७७ दिवसात २ लाख २३ हजार ४६० मे. टन ऊस गाळप करुन दि. १४ जानेवारी अखेर एकूण २ लाख ५० हजार ३०० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा ११.२८ टक्के आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी प्रमाणे आणि ऊस तोडणी वाहतूक ठेकेदारांना नियमांप्रमाणे वेळेवर पेमेंट तसेच कारखाना अधिकारी कर्मचाऱ्यांना दरमहा नियमानुसार पेमेंट करण्यात श्रीराम कारखाना अग्रेसर असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी नेहमी जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना लि., हुपरी संचलित श्रीराम सहकारी साखर कारखाना लि., फलटणला प्रथम पसंती दिली आहे.
श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या गेल्या ६३ वर्षाच्या इतिहासात यावर्षी ऊस गाळप आणि स्पिरिट उत्पादनात श्रीरामने दि. १ फेब्रुवारी रोजी एक दिवसात ३९५२ मे. टन तर अर्कशाळेच्या २७ वर्षाच्या इतिहासात एक दिवसात ४१ हजार ५८७ लिटर इतके विक्रमी उत्पादन घेऊन नवा इतिहास निर्माण केला आहे.
महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, माजी खासदार, माजी मंत्री कलाप्पा आण्णा आवाडे यांनी या उज्वल कामगिरीबद्दल दोन्हीकारखान्यातील अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.