जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत जादा दरडोई खर्चाच्या योजनांना उच्चाधिकार समितीची मान्यता


दैनिक स्थैर्य । दि. ०७ सप्टेंबर २०२२ । मुंबई । केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत विहित निकषापेक्षा जादा दरडोई खर्च असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या २ व जिल्हा परिषदेच्या २५३ अशा सुमारे ३१४ कोटी रुपयांच्या २५५ ग्रामीण पाणी पुरवठा योजनांच्या प्रस्तावांना आज मान्यता देण्यात आली. पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या उच्चाधिकार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

बैठकीस पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वालमहाराष्ट्र जीवन प्राधीकरणाचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णाजलजीवन मिशनचे अभियान संचालक ऋषिकेश यशोदभूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणापुणेचे आयुक्त सी. डी. जोशी उपस्थित होते.

जल जीवन मिशन हा केंद्र शासनाचा महत्वाकांक्षी व कालबद्ध कार्यक्रम असून त्यांतर्गत 2024 पर्यंत देशातील सर्व ग्रामीण कुटुंबांना वैयक्तिक नळ जोडणीद्वारे दरडोई ५५ लिटर मानकाप्रमाणे शाश्वत व गुणवत्तापूर्ण पेयजल उपलब्ध करुन देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. शासनाच्या दि.२९.०६.२0२२ च्या शासन निर्णयानुसार ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजनांसाठी दरडोई खर्चाचे सुधारीत निकष निश्चित करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!