
स्थैर्य, फलटण दि.10 : स्थैर्य, सासकल दि.10 : मौजे सासकल, ता.फलटण येथे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या फंडातून सासकल येथील दलित वस्ती परिसरामध्ये हायमास्ट लाईट पोलचे अनावरण सासकल जनआंदोलन समितीचे अध्यक्ष शिवाजीराव मुळीक व प्रमुख सल्लागार भानुदास घोरपडे, विनायक मदने, सचिन खुडे यांच्या हस्ते पार पडले.
यावेळी बोलताना शिवाजीराव मुळीक म्हणाले, ज्या ठिकाणी हा पोल बसवला आहे त्याठिकाणी दलित वस्तीचा परिसर असून याठिकाणी पिण्याच्या पाण्याची टाकी असल्यामुळे इथे लाईटची आवश्यकता होती. ही बाब आम्ही खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी लगेच सदर जागेवर लाइटचा पोल मंजूर केला. तसेच आगामी काळात स्ट्रीटलाइट देण्याचेही मंजूर केले आहे.
यावेळी दिनेश मदने, विशाल घोरपडे, अरविंद खुडे, विष्णू खुडे, अरुण खुडे, संदीप खुडे, अक्षय मुळीक, महेश मदने, रोहन घोरपडे, भीमराव खुडे, आकाश घोरपडे, सूरज जगताप, सामाजिक कार्यकर्ते सोमिनाथ सर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.