दैनिक स्थैर्य । दि.१३ जानेवारी २०२२ । लोणंद । लोणंद नगरपंचायत निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षण असलेल्या ४ जागा सर्वसाधारण करुन त्या जागाची निवडणुक १८ जानेवारीला होत असून अर्ज माघारीनंतर लोणंद नगरपंचायतीच्या ४ जागासाठी १९ उमेदवार मैदानात राहिले आहेत, अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी शिवाजीराव जगताप तथा सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी हेमंत ढोकले यांनी दिली. लोणंद नगरपंचायतीच्या या चारही प्रभागामध्ये सर्वच पक्ष आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी ताकद लावणार असल्याने या चारही प्रभागात हायहोल्टज मुकाबला होण्याची शक्यता दिसत आहे.
लोणंद नगरपंचायतीच्या १७ प्रभागापैकी १३ प्रभागाची निवडणुक झाली असुन ओबीसी आरक्षण असलेल्या ४ प्रभागाचे आरक्षण सर्वसाधारण करुन निवडणुक आयोगाने या ४ जागाचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या ४ जागासाठी ४१ उमेदवारी अर्ज दाखल केले होते, अर्ज मागे घेतल्यानंतर ४ जागासाठी १९ उमेदवार निवडणुक लढत आहेत असुन प्रभाग क्रमांक १ मध्ये चौरंगी तर प्रभाग क्रमांक २,११, १६ मध्ये पंचरंगी लढत होणार आहे.
नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक १ मध्ये वर्षा हणमंत शेळके राष्ट्रवादी, दिपाली संदीप शेळके भाजपा, प्रतिभा राहुल शेळके कॉग्रेस, अनिता बाबुराव माचवे शिवसेना यांच्यात लढत होणार असुन प्रभाग क्रमांक २ मध्ये निर्मला दादासाहेब शेळके राष्ट्रवादी, आसिया साजिद बागवान कॉग्रेस, डॉ. संगिता किशोर बुटियानी, राधिका संजय जाधव शिवसेना, मनिषा चद्रकांत शेळके अपक्ष यांच्यात लढत होणार आहे. तर प्रभाग क्रमांक ११ मध्ये भरत जयवंत बोडरे राष्ट्रवादी, उत्तम शामराव कुचेकर काँग्रेस, विश्वास सदाशिव शिरतोडे शिवसेना, श्रीकुमार सुरेश जावळे भाजपा, शरद वसंतराव भंडलकर यांच्यात लढत होणार असुन प्रभाग क्रमांक १६ मध्ये विनया दत्तात्रय कचरे राष्ट्रवादी, प्रविण बबन व्हावळ कॉग्रेस, प्रदीप नामदेव क्षीरसागर भाजपा, गणेश शंकर पवार शिवसेना, जावेद शहाबुद्दीन पटेल अपक्ष यांच्यात लढत होणार आहे.