साखरवाडी विद्यालयावरील प्रशासक उच्च न्यायालयाने हटवला : ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे – पाटील


दैनिक स्थैर्य | दि. 17 एप्रिल 2025 | साखरवाडी | येथील साखरवाडी विद्यालयावर प्रशासक नियुक्त करण्याचा आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिलेला होता त्यावर मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली असता मुंबई उच्च न्यायालयाने प्रशासक हटवून पुन्हा संस्था ही संचालक मंडळाच्या ताब्यात दिली असल्याची माहिती ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील यांनी दिली.

साखरवाडी विद्यालयावर प्रशासकाची नियुक्ती ही धर्मदाय आयुक्तांनी केलेली होती. या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये संचालक मंडळाने दाद मागितली होती. सदरील सुनावणी दरम्यान प्रशासक हटवण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने घेतला असल्याची माहिती ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे – पाटील यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे – पाटील म्हणाले की, साखरवाडी विद्यालयाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण देण्यासाठी संचालक मंडळ हे कायमच कटिबद्ध राहिलेले आहे. पुढील काळामध्ये सुद्धा साखरवाडी मधील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार साखरवाडी विद्यालयावरील प्रशासकाची नियुक्ती हटवण्यात आलेली आहे.


Back to top button
Don`t copy text!