हाय स्पीड इलेक्ट्रिक स्कूटर ‘अंबियर एन८’ लॉन्च

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २६ जुलै २०२३ । मुंबई । मेक-इन-इंडिया ईव्ही निर्माता, एनिग्मा ऑटोमोबाईल्स ने आपल्या बहुप्रतीक्षित अंबियर एन८ (Ambier N8) इलेक्ट्रिक स्कूटरच्या अधिकृत शुभारंभाची घोषणा केली आहे. सिंगल चार्जवर २०० किलोमीटरची उल्लेखनीय रेंज आणि २-४ तासांच्या वेगवान चार्जिंगसह अंबियर एन८ इलेक्ट्रिक स्कूटर उद्योगात क्रांती घडवून आणण्यासाठी सज्ज आहे. एन८ थंडरस्टॉर्म राखाडी, पांढरा, निळा, मॅट ब्लॅक आणि रुपेरीसह पाच आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असून या ईव्हीची किंमत एक्स-शोरूम १,०५,००० /- रुपयांपासून ते १,१०,००० /- रुपयांपर्यंत आहे.

अंबियर एन८ ही एक हाय-स्पीड, आरटीओद्वारे मंजूर इलेक्ट्रिक स्कूटर आहे, जी वाहतुकीच्या नवीन युगाचे तत्व आहे. शक्तिशाली १५०० वॅट मोटरसह सुसज्ज, अंबियर एन८ एक रोमांचक सवारी पुरवते आणि ४५कि.मी. प्रति तास – ५० कि.मी. प्रति तासच्या टॉप स्पीडपर्यंत पोहोचते. व्यावहारिकतेसाठी डिझाइन करण्यात आलेल्या, या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ड्रायव्हरसह 200 किलोची लोड क्षमता आहे, ज्यामुळे प्रवासी आणि माल दोन्हींची सहजपणे वाहतूक होऊ शकते. याव्यतिरिक्त, अंबियर एन८ मध्ये विस्तृत २६ – लीटर बूट क्षमता आहे, जी दररोजच्या अत्यावश्यक गोष्टींसाठी पुरेसे स्टोरेज प्रदान करते.

एनिग्मा ऑटोमोबाईल्सचे सहसंस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक. श्री अनमोल बोहर  म्हणाले, “सिंगल चार्जवर २०० किलोमीटरची प्रभावशाली रेंज पाहता, अंबियर एन८ रायडर्सना आत्मविश्वासाचे सामर्थ्य देते कारण त्यांना माहित असते की रेंजची चिंता न करता त्यांना शोध घेण्याचे स्वातंत्र्य आहे.


Back to top button
Don`t copy text!