लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त ‘ही दौलत लोकशाहीराची’ कार्यक्रम संपन्न


स्थैर्य, फलटण, दि. १३ ऑगस्ट : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त, डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडिया, फलटण तालुक्याच्या वतीने सोमवार पेठ येथे ‘ही दौलत लोकशाहीराची’ या भीमगीतांच्या बहारदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुप्रसिद्ध अमोलराज प्रस्तुत या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी अरिहंत टीव्हीएसतर्फे सिद्धांत दोशी यांनी शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले.

अमोलराजचे गायक राजेश माने, सागर भोसले आणि ‘फॅन झालो ग’ फेम ऋतिक गंगावणे यांनी सादर केलेल्या गीतांना प्रेक्षकांनी दाद दिली. या कार्यक्रमाला ॲड. संदीप कांबळे, माजी नगरसेवक विक्रम जाधव, पत्रकार सचिन मोरे, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष सनीभाई ननावरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा युथ अध्यक्ष मंगेश आवळे, तालुकाध्यक्ष निलेश घोलप, युथ तालुकाध्यक्ष गणेश यादव, आदित्य पाटोळे आणि रोहित आडागळे यांनी परिश्रम घेतले.


Back to top button
Don`t copy text!