हिरोच्या दुचाकी ६ ते १५ हजारांनी स्वस्त; सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना मोठा दिलासा

GST २८% वरून १८% झाल्याचा परिणाम; बोरावके हिरोची नवरात्री-दसर्‍यासाठी खास प्री-बुकिंग ऑफर


स्थैर्य, फलटण, दि. ११ सप्टेंबर : वस्तू व सेवा करात (GST) झालेल्या कपातीमुळे हिरो मोटोकॉर्पच्या दुचाकींच्या किमतीत मोठी घट झाली आहे. आगामी दसरा-दिवाळी सणांच्या पार्श्वभूमीवर, हिरोच्या गाड्या मॉडेलनुसार ६,००० ते १५,००० रुपयांपर्यंत स्वस्त होणार असल्याची माहिती फलटणचे अधिकृत विक्रेते बोरावके हिरो यांनी दिली आहे.

शासनाने दुचाकींवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आणल्याने ग्राहकांची मोठी बचत होणार आहे. या नवीन किमती दि. २२ सप्टेंबरपासून लागू होतील. यामुळे सणासुदीच्या काळात नवीन गाडी खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यासोबतच, बोरावके हिरो यांनी ग्राहकांसाठी एक खास ‘प्री-बुकिंग डिस्काउंट ऑफर’ जाहीर केली आहे. दि. २१ सप्टेंबरपर्यंत ५,००० रुपये भरून गाडी बुक करणाऱ्या आणि दि. २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान डिलिव्हरी घेणाऱ्या ग्राहकांना १,००० रुपयांचा रोख डिस्काउंट मिळणार आहे. ही ऑफर ‘स्प्लेंडर सिरीज’ वगळता इतर सर्व गाड्यांवर लागू असेल.

ग्राहकांसाठी जुन्या गाडीवर चांगला भाव आणि एक्स्चेंज बोनसची सुविधाही उपलब्ध आहे. तसेच, कमीत कमी डाउन पेमेंट आणि कमी व्याजदरात कर्ज सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. हिरोचे सर्व मॉडेल्स आणि रंग बोरावके हिरोच्या मुख्य शोरूमसह सर्व सब-डिलरकडे उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी बोरावके हिरो, जिंती नाका, फलटण येथे किंवा ९९२२७७८५६६ व ९७६२४५७५२७ या क्रमांकांवर संपर्क साधावा.


Back to top button
Don`t copy text!