क्रिप्टो गुंतवणूक मंच क्रिप्सोची ३ दशलक्ष डॉलर्सची निधी उभारणी

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २७ जुलै २०२२ । मुंबई । क्रिप्टोकरन्सीजसाठीचा समुदायाच्या पुढाकाराने चालवणारा जाणारा मंच क्रिप्सोने हर्षद इमर्जण्ट, अथेरा व्हेंचर पार्टनर्स (पूर्वीचे नाव इन्वेण्टस), बेटर कॅपिटल, व्हाइटबोर्ड कॅपिटल, पोलीगॉनचे संस्थापक संदीप व जयंती, क्रेडचे कुणाल शहा आणि अन्य एंजल गुंतवणूकदारांमार्फत ३ दशलक्ष डॉलर्सचे बीजभांडवल उभे केले आहे. नव्याने मिळालेल्या निधीचा उपयोग कंपनी आपल्या वापरकर्त्यांची संख्या व व्याप्ती वाढवण्यासाठी तसेच उत्पादन व तंत्रज्ञानांची व्याप्ती वाढवण्यासाठी करणार आहे.

२०२२ मध्ये ट्रूबिल डॉटकॉमचे संस्थापक श्री. सूरज कलवानी, श्री. रवी चिरानिया आणि श्री. राकेश रमन यांनी स्थापन केलेला क्रिप्सो हा भारतातील अशा प्रकारचा एकमेव समुदायकेंद्री प्लॅटफॉर्म आहे. हा प्लॅटफॉर्म क्रिप्टो वापरकर्त्यांना क्रिप्टोमधील नवीनतम कलांबद्दल जाणून घेण्याची व ते शोधण्याची क्षमता देतो तसेच क्रिप्टो तज्ज्ञांनी निर्माण केलेल्या अनेकविध ऑल्टकॉइन्सवर वन-क्लिक ट्रेड सिग्नल्सद्वारे गुंतवणूक करण्याचीही क्षमता देतो.

मिलेनिअल्स व जनरेशन झेड वापरकर्त्यांवर लक्ष केंद्रित करणाऱ्या क्रिप्सोचे ध्येय क्रिप्टोचे सुलभीकरण करणे तसेच रिटेल वापरकर्त्यांना समुदायकेंद्री दृष्टीकोनातून मार्गदर्शित प्रवेश देऊ करणे हे आहे. केवळ अँड्रॉइडवर उपलब्ध असलेल्या या प्लॅटफॉर्मने स्थापनेनंतर महिनाभरातच ५०,००० हून अधिक सक्रिय वापरकर्ते जमवले आणि १०० हून अधिक क्रिप्टो इनफ्लुएन्सर्स, क्रिएटर्स व तज्ज्ञही, क्रिप्टोचे दैनंदिन कल व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी या अॅपचा वापर करू लागले. यातील २५ टक्क्यांहून अधिक वापरकर्ते सोशल सिग्नल्सद्वारे ट्रेडिंग करत आहेत. स्थापनेनंतर दोनेक आठवड्यांतच या प्लॅटफॉर्मने १ कोटींहून ट्रेड व्हॉल्युम्स साध्य केले.

क्रिप्सोचे सहसंस्थापक व सीईओ सूरज कलवानी म्हणाले, “क्रिप्टो हा मुलभूतरित्या सामाजिक असेट वर्ग आहे आणि तरुण भारतीय वापरकर्ते क्रिप्टोबाबतच्या ताज्या घडामोडी, विश्लेषण व गुंतवणुकीच्या इशाऱ्यांसाठी आपले समवयस्क, इन्फ्लुएन्सर्स व गुंतवणूक समुदायांसोबत सक्रियपणे संवाद साधत असतात. क्रिप्टोमुळे आम्ही शोध व व्यवहार यांच्यातील अंतर मार्गदर्शित क्रिप्टो गुंतवणुकीच्या सहाय्याने भरून काढत आहोत. वापरकर्ते अन्य गुंतवणूकदारांसोबत तसेच तज्ज्ञांसोबत जोडून घेऊ शकतात, त्यांच्या पोर्टफोलिओतील हालचालींचा माग ठेवू शकतात आणि क्रिप्टोमधील कल व गुंतवणूक संधींचा पुरेपूर लाभ घेऊ शकतात.”

नवीन क्रिप्टो गुंतवणूकदार, इन्फ्लुएन्सर्स आणि तज्ज्ञांना एका प्लॅटफॉर्मद्वारे जोडून, हा प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांना कम्युनिटी ग्रुप चॅट्समध्ये सहभागी होऊन नवीन युक्त्या शिकण्यात मदत करत आहे.


Back to top button
Don`t copy text!