महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषदेच्यावतीने हेरिटेज सप्ताहाचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २१ डिसेंबर २०२१ । महाबळेश्वर । महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेच्यावतीने  “ हेरिटेज सप्ताह 2021 ” साजरा करण्यात येत आहे. हा सप्ताह दि. 21 ते 27 डिसेंबर या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहाचे उद्घाटन  वारसा स्थळ जतन समिती  महाबळेश्वरचे अध्यक्ष दिलीप बंड  व  जिल्हाधिकारी शेखर सिंह  यांच्या हस्ते  महाबळेश्वर येथे करण्यात आले.

याप्रसंगी माझी वसुंधरा अभियान व स्वच्छ सर्वेक्षण 2022 अंतर्गत ई-सायकल ट्रॅक ओपनिंग नर्सरीचे लोकार्पण, वेणा लेक येथे इलेक्ट्रीक बोटीचे उद्घाटन, कचऱ्यातून निर्माण केलेल्या पेव्हर ब्लॉक व बेंचचे लोकार्पण तसेच हेरिटेज वास्तू फोटो प्रदर्शनाचे उद्घाटन  करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे, उपनगराध्यक्ष अफजल मुबारक सुतार, तहसिलदार सुषमा चौधरी-पाटील, मुख्याधिकारी पल्लवी पाटील, नगरसेवक, नगरपालिकेचे अधिकारी -कर्मचारी व विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

या सप्ताहानिमित्त महाबळेश्वर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यातआले आहे. दि. 22 डिसेबर रोजी निबंध स्पर्धा, दि. 23 डिसेंबर रोजी सर बोमनजी दिनशा पेटीट लायब्ररी हेरिटेज वस्तुचे प्रदर्शन, दि .24 डिसेंबर रोजी हेरिटेज वॉक. दि. 25 डिसेंबर रोजी मुंबई पॉईंट स्वच्छता अभियान, दि. 26 डिसेंबर रोजी सर बोमनजी दिनशा पेटीट लायब्ररी मान्यवर व तज्ञ व्यक्तिंचे मार्गदर्शन व दि. 27 डिसेंबर रोजी सर बोमनजी दिनशा पेटीट लायब्ररी येथे   बक्षिस वितरण समारंभ होणार आहे.


Back to top button
Don`t copy text!