दैनिक स्थैर्य । दि.०९ मार्च २०२२ । फलटण । जळोची येथील प्रेरित फाउंडेशन तर्फे जागतिक महिला दिनानिमित्त हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 80 महिलांचे हिमोग्लोबिन तपासण्यात आले.
या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बारामती नगरपालिकेच्या माजी नगरसेविका नीलिमा मलगुंडे, आशा माने, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माजी सभापती छाया जमदाडे, छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या माजी संचालिका राणी ढवाण, जळोची गावच्या माजी सरपंच कुसुम बगाडे, जळोची गावच्या माजी सरपंच अरुणाताई पागळे, जळोचीच्या माजी उपसरपंच अनुसया जमदाडे, वनिता सातकर, उज्वला जमदाडे, वंदना सातव, मनिषा जमदाडे, रेश्मा जमदाडे, अंगणवाडी सेविका शिंदे व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन केक कापून करण्यात आले. याप्रसंगी नीलिमा मलगुंडे, वनिता सातकर, छाया नवनाथ जमदाडे यांनी महिला दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉक्टर गीतांजली शिंदे यांनी महिलांना आरोग्य, आहार व व्यायाम याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रेरित फाउंडेशनच्या सदस्या प्रिया जमदाडे यांनी केले.
सूत्रसंचलन प्रतिभा जमदाडे हिने केले. हिमोग्लोबीन तपासणी शिबिराकरीता विघ्नहर्ता लॅबरोटरीचे विशेष सहकार्य लाभले.