‘मविआ’ विरोधात हेमंत पाटील निवडणूक रिंगणात ! बीएमसीच्या सर्व जागांवर ‘आयएसी’ निवडणूक लढवणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २४ डिसेंबर २०२२ । मुंबई । राज्यातील शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित महाविकास आघाडी विरोधात ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’चे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी रणशिंग फुंकले आहे.’भ्रष्टाचार मुक्त महापालिका’ या संकल्पपूर्तीसाठी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सर्वच जागांवर ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ उमेदवार उभे करणार असून पालिकेत पारदर्शक कारभार आणण्यासाठी मतदान त्यांना निवडून देतील,असा विश्वास हेमंत पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केला.नवीन राजकीय पर्यायासाठी संघटनेकडून टाकण्यात आलेले हे पहिले पाऊल आहे, अशी भावना पाटील यांनी व्यक्त केली.

गेल्या अनेक वर्षांपासून पालिकेवर ठाकरे गटाचे वर्चस्व होते.यंदा मात्र, मुंबईकर पारदर्शक कारभार करणाऱ्या संघटनेमागे आपली संपूर्ण ताकद उभी करेल,असे पाटील म्हणाले.संघटनेने यापूर्वी देखील मुंबई महानगर पालिका निवडणूक लढवली आहे.शिवाय गेल्या अडीच दशकात संघटनेने पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर महानगर पालिकेत देखील आपले उमेदवार उभे केले आहेत. निवडणूक लढवण्याचा दांडगा अनुभव संघटनेच्या पाठीशी आहे. त्यामुळे यंदा संघटनेचे नेतृत्व करीत जनमाणसाच्या मनातील नेतृत्व निवडून आणू,असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

झोपडपट्टी धारकांना निशुल्क ६०० चौरस फुटाचे घर मिळावे, बालकांना मोफत शिक्षण, रुग्णालयातील उपचारासाठी सर्वांना ५० लाखांचा विमा, महिलांना महिन्याकाठी १ हजार रुपयांचा भत्ता मिळवून देण्यासाठी मतदार इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या मागे खंबीरपणे उभे राहतील,असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.शिवाय पालिका अंतर्गत येणाऱ्या विकासकामांसाठी निविदा न काढता थेट पालिका मार्फत ही कामे करवून घेत कारभारात पारदर्शकता आणण्याचा संकल्प असल्याचे हेमंत पाटील म्हणाले.


Back to top button
Don`t copy text!