दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑगस्ट २०२२ । मुंबई । घराणेशाहीला प्रोत्साहन देणारे राजकीय पक्ष देशाच्या भविष्यासाठी तसेच उदयोन्मुख नव नेतृत्वासाठी घातक आहे, असे प्रतिपादन इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी मंगळवारी केले.भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी राजकीय तसेच प्रादेशिक पक्षांसबंधी केलेल्या वक्तव्याचे समर्थन देखील पाटील यांनी केले आहे. विविध राजकीय पक्षांमधील ‘भाई-भतीजा’संस्कृतीमुळे नव नेतृत्वाला संधी मिळत नाही. घराणेशाहीच्या माध्यमातून अपरिपक्व नेतृत्व देश आणि राज्यासह स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लादले जात आहे. पंरतु, ‘पार्टी विथ डिफरन्स’ असलेल्या भारतीय जनता पार्टीमध्ये घराणेशाहीला थारा नाही. देशात आणि विविध राज्यात भाजपचे काम त्यामुळे योग्य आणि चांगल्या पद्धतीने सुरू आहे. कार्यकर्तांचा कार्यकर्त्यांकडून कार्यकर्त्यांसाठी चालवला जाणारा पक्ष अशी भाजपची ओळख आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोलाची साथ भाजप सोबत आहे.कुठल्याही पदाची अपेक्षा न करता लाखो स्वयंसेवक संघटनेसाठी, विचारधारेसाठी झपाटून काम करीत आहेत.पक्षातील एकनिष्ठता तसेच संघाचे पाठबळच भाजपला मोठे करीत आहे. संघाच्या विविध शाखांमधून समाजपयोगी कार्यक्रम,उपक्रमातून समाजप्रबोधणाचे काम केले जात आहे.त्यात संघाच्या विचारसरणीनूसार भाजप मार्गक्रमण करीत आहे.विकासाची काम करणाऱ्यांना भाजपमध्ये प्रथम स्थान दिले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात विश्वात भारताचा ठसा उमटला आहे.
२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत देखील भाजप मोठे यश संपादित करेल.घराणेशाहीला दूर ठेवल्याने हे शक्य आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी नंतर सर्वसामान्य कुटुंबातील आणखी कुणी दुसरा नेता पंतप्रधान होवू शकतो.भाजपमध्ये गटतटाचे राजकारण नाही.अशात हा पक्ष अनेक दशकांपर्यंत टिकेल,असा दावा देखील पाटील यांनी केला.इतर पक्षांनी घराणेशाही सोडून देत नव नेतृत्वाला संधी देण्याची गरज आहे.विद्यार्थी राजकारणातून समोर आलेल्या नेतृत्वाला पाठबळ देण्याची आवश्यकता आहे.तरुण नेतृत्वामुळेच देशासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे एक चांगले व्हिजन ठेवले जाईल.अशात घराणेशाही, कुटुंबवाद सोडून सर्वसामान्यांसाठी असलेले पक्षच येत्या काळात टिकातील,असे भाकित पाटील यांनी व्यक्त केले.