दैनिक स्थैर्य । दि.१३ जानेवारी २०२२ । लोणंद । लोणंद नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हेमंत ढोकले यांची नगर येथे परिविक्षाधिन तहसीलदारपदी नुकतीच नियुक्ती झाली आहे . शासकीय आदेशानुसार १७ जानेवारीपासून त्यांचे प्रशिक्षण सुरू होत आहे . दरम्यान , लोणंद नगरपंचायतीचे एक कामसू अधिकारी आणि येथील सर्व स्तरातील नागरिकांशी थेट संपर्कात राहाणारे मुख्याधिकारी हेमंत ढोकले यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. मुख्याधिकारी ढोकले यांनी दोन वर्षांपूर्वी नगरपंचायतीचा कारभार स्वीकारल्यावर दीड वर्षापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांची तहसीलदार म्हणून निवड झाली होती. मात्र , कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने सर्व नियुक्त्या स्थगित केल्या होत्या. मात्र, शासन ३ निर्णयानुसार तहसीलदार यांचे एकत्रित परिविक्षाधिन प्रशिक्षण कार्यक्रम जाहीर केला असून, १७ जानेवारीपासून सुरू 5 होणार आहे. त्यामुळे नगरपंचायतीचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहात असणारे मुख्याधिकारी ढोकले यांना मतदानापूर्वी एक दिवस अगोदर नगर येथे रुजू व्हावे लागणार आहे. श्री. ढोकळे यांनी सुरुवातीला राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवत पोलिस उपनिरीक्षक काहीकाळ काम केले आहे. त्यानंतर मुख्याधिकारी व आता तहसीलदारपदी नियुक्ती झाली आहे. लोणंद मुख्याधिकारी पदाची जबाबदारी सक्षमपणे पेलताना नागरिक व पदाधिकारी यांच्या प्रश्नात व लोकोपयोगी विविध कामांत स्वतः जातीने लक्ष घालून ती मार्गी लावण्यासाठी त्यांचा सतत प्रयत्न होता.