
स्थैर्य, फलटण, दि. १२ ऑगस्ट : विद्यानगर येथील रहिवासी हेमंत लक्ष्मण दळवी यांचे वयाच्या ८० व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले.
ते मंगेश, केदार आणि योगेश दळवी यांचे वडील होत.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.