स्थैर्य, फलटण दि.२७ : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गोरगरीब लोकांचे जगणे अवघड झाले आहे. दिवसभर काम केले तरच रात्रीची चुल पेटते अशी परिस्थिती असलेल्या लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा लोकांची उपासमार होवू नये या जाणीवेतून माणूसकी प्रतिष्ठानच्यावतीने फलटण तालुक्यातील गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंची मदत देण्याचे काम सुरु आहे.
माणूसकी प्रतिष्ठानच्यावतीने ‘एक हात मदतीचा’ हा उपक्रम राबवण्यात येत असून या उपक्रमांतर्गत समाजातील दानशूर व्यक्तींकडून मदत घेवून जीवनावश्यक वस्तू जमा करुन त्या गरजू कुटूंबांना देण्याचे काम सुरु आहे. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अजय खुसपे, पदाधिकारी अलंकार भोईटे पाटील, अरमान शेख, अक्षय पुंडेकर, स्वप्नील शेंडे, तेजस खुसपे, चैतन्य राऊत, घनश्याम गावडे, अनिकेत नलवडे, प्रशांत शिंदे, रणजित चतुरे, अक्षय चव्हाण हे या उपक्रमांतर्गत गरजूंच्या मदतीला धावून जाण्याचा प्रयत्न करीत आहेत.