दैनिक स्थैर्य | दि. ५ नोव्हेंबर २०२४ | फलटण |
‘वायएलटीपी’ मित्र परिवार, भोरवाडी व समस्त ग्रामस्थ, गोखळी यांचेकडून दिवाळी एक हात मदतीचा अंतर्गत ज्ञानेश गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था, भाडळी बु. यांना शालेय साहित्यासह, मृदंग, टाळ, हर्मोनियम, वॉटर प्युरिफायरसह संस्थेतील विद्यार्थ्यांना पोशाख अशी जवळपास ५० हजार रुपयांची दिवाळी स्नेहभेट देण्यात आली.
‘दिवाळी एक हात मदतीचा’ हा उपक्रम गावोगावी व्हावा आणि पिढ्यान्पिढ्या समृद्ध करणारा ठरावा इतका स्तुत्य असून याच्या महोत्सवी वर्षापर्यंत हा सेवेचा महायज्ञ असाच चालू रहावा, असा मनोदय प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्री. शंकरराव सोनवलकर यांनी व्यक्त केला.
गेल्या ५ वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात असून यामध्ये अनाथाश्रम, सांप्रदायिक शिक्षण संस्थांना दिवाळी फराळ, शैक्षणिक साहित्य स्नेहभेट म्हणून दिले जात असून यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष गोखळीकर ग्रामस्थ तसेच वायएलटीपी मित्रमंडळाचा मोलाचा वाटा आहे. सेवाभावी संस्थांना दिलेल्या या मदतीतून अनेक डॉक्टर, इंजिनिअर घडवले असून यापुढेही सेवेचा वटवृक्ष असाच वाढत राहो, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.
परमार्थ, आध्यात्म, देव, देश अन् धर्माची सेवा करणारे असे मदतीचे हातच समाजात सेवेच महत्त्व रुजवतील, असा विश्वास यावेळी विशेष उपस्थिती लाभलेले समाजभूषण ह. भ. प. चैतन्य महाराज राऊत यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी समाजभूषण ह. भ. प. चैतन्य महाराज राऊत, कृ. उ. बा. स. सचिव श्री. शंकरराव सोनवलकर, श्री. मोहनराव डांगे (चेअरमन, मातोश्री विकास सोसा, भाडळी बु.), ह. भ. प. प्रभाकरनाना गावडे (उपाध्यक्ष, वारकरी सांप्रदाय फलटण तालुका), ह. भ. प. जितूनाना फडतरे, श्री. सागरदादा गावडे (अध्यक्ष, प्रहार फलटण तालुका), श्री. अभिजीत जगताप (मा. उपसरपंच, गोखळी), पै. चांगदेव शिरतोडे, ह. भ. प. नितीनभैय्या गावडे, श्री. सूरज गावडे, ह. भ. प. पांडुरंग लाळगे, श्री. संतोष खुसपे, चि. प्रसाद जाधव, चि. अक्षय मुळीक, श्री. दिपक गायकवाड तसेच ग्रामस्थ गोखळी, संस्थेतील विद्यार्थी हे उपस्थित होते.
यावेळी ह. भ. प. स्वप्निल महाराज शेंडे यांनी आभार मानले.