कोरोनाच्या काळात टीकेच्या राजकारणापेक्षा प्रशासनाला मदत करा : प्रदीप माने

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, खंडाळा, दि. २१ : शासनाच्यावतीने शिरवळ, पाडेगाव या ठिकाणी उभारण्यात आलेल्या कोरोना केअर सेंटर मधील सुविधा बाबत काही प्रश्न उपस्थित करून प्रशासनाला मदत करण्याऐवजी खंडाळा तालुका, सातारा जिल्हयाची बदनामी करीत आहेत. त्यांना शिवसैनिक सडेतोड उत्तर देतीलच पण कोरोनाच्या काळात कोणीही तालुक्यात राजकारण करू नये, असा सल्ला शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख प्रदीप माने यांनी दिला.

पाडेगाव येथील होम क्वारंटाईन सेंटरला सातारा जिल्हा माजी उपजिल्हाप्रमुख प्रदीप माने यांनी भेट दिली या वेळी ते बोलत होते. यावेळी माजी शहर प्रमुख सुनिल यादव, शिवसेना खंडाळा तालुका सचिव दत्तात्रय राऊत, ज्येष्ठ शिवसैनिक लक्षणतात्या जाधव उपस्थित होते. दरम्यान, क्वारंटाईन सेंटरमधील नागरीकांना देण्यात येत असलेल्या सुविधांची आरोग्य विस्तार अधिकारी बाबासाहेब सानप यांनी माहीती दिली. यावेळी प्रदीप माने यांनी महिला व पुरुष दोन्ही सेंटरला भेट दिली. प्रदीप माने म्हणाले, कोरोना रुग्णांच्या हाय रिस्कमध्ये आलेल्या नागरिकांना शिरवळ व पाडेगाव येथे ठेवण्यात येत आहे. या ठिकाणच्या सुविधेच्या बाबत काही अडचणी होत्या. त्या प्रशासनाने सोडविल्या आहेत. परंतु, काही जण उगाचच या गोष्टीचे भांडवल करून प्रशासनाचे खच्चीकरण करत आहेत. काही त्रुटी असल्यास प्रशासनाच्या निर्दशनास आणून द्याव्यात. कोरोनाच्या काळात कोणीही राजकारण करू नये, अन्यथा शिवसेनाही त्याच भाषेत उत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!