स्थैर्य, फलटण दि.२७ : वाखरी (ता.फलटण) गावातील तरुण, लघुउद्योजक, शिक्षक, विविध विभागात काम करणारे कर्मचारी, पोलीस, फौजी यांनी एकत्रित येवून ‘कोवीड मदत कक्ष’ स्थापन केला असून या मदत कक्षाच्या माध्यमातून अनेक गरजूंना मदतीचे काम सुरु आहे.
वाखरी गावातील कोवीड रुग्णांना प्राथमिक औषधोपचारासाठी थेट बँक खात्यात आर्थिक मदत जमा करण्यात आली आहे. मदत कक्षाचे सदस्य कृष्णात कुंभार यांच्या वाढदिवसानिमित्त 10 कुटूंबांना जीवनावश्यक वस्तूंचे कीट देण्यात आले आहे. मदत कार्याबरोबरच गावात कोरोनाला दूर ठेवण्यासाठी पाळावयाच्या निर्बंधांविषयी जनजागृती करण्याचे कार्यही या कोवीड मदत कक्षाच्या माध्यमातून सुरु असल्याची माहिती, सदस्यांनी दिली.