
बारामती : विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करत असताना
मानवबंध फाउंडेशनचे सदस्य.
स्थैर्य, बारामती, दि. 11 ऑगस्ट : काटेवाडी, ता. बारामती येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये मानवबंध फाउंडेशनच्यावतीने सोमवार (दि. 4) रोजी, विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. या प्रसंगी फाउंडेशनच्या अध्यक्षा सुषमा चव्हाण, मुख्याध्यापक लक्ष्मण गिरीगोसावी, मुख्याध्यापक ज्ञानदेव बोरकर, मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. नजीर मुल्ला सुत्रसंचालन यांनी केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळाले. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मदत व्हावी, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करत असल्याचे सुषमा चव्हाण यांनी सांगितले.