खानापूरच्या युवकाचा परखंदीत निर्घृण खून; वाई तालुक्यात खळबळ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०७ फेब्रुवारी २०२३ । सातारा । परखंदीच्या शिवारात सकाळी अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळतात वाई पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. मृतदेहाची ओळख पोलिसांनी पटवली असून, खून झालेला युवक हा खानापूर येथील अभिषेक जाधव (वय 30) असल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, वाईच्या डीवायएसपी डॉ. शीतल जानवे खराडे यांच्यासह पोलीस दाखल झाले आहेत. या घटनेमुळे वाई तालुक्यात खळबळ उडाली आहे.

प्रेम प्रकरणातून या युवकाचा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दरम्यान खानापूरमध्ये तणावाचे वातावरण झालेले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती, अशी शुक्रवारी सकाळी परखंदी गावातील काही नागरिक शेताकडे जात असताना त्यांना एका युवकाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी ही बाब लगेच वाई पोलिसांना सांगितली. वाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, पोलीस उपनिरीक्षक स्नेहल सोमदे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णराव पवार, डीबी पथकाचे विजय शिर्के, श्रावण राठोड, प्रसाद दुदुस्कर यांच्यासह सर्व टीम तत्काळ घटनास्थळी पोहोचली. त्यांनी मृतदेहाबाबत चौकशी केली असता व मृतदेहाच्या जवळील काही कागदपत्रावरून युवक खानापूर येथील अभिषेक जाधव असल्याचे समोर आले. त्यानंतर मृतदेह तात्काळ शवविच्छेदनासाठी सातारा येथे पाठवण्यात आला.

प्राथमिक माहितीनुसार, युवकाचा खून प्रेम प्रकरणातून झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली असून खानापूर येथे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तेथेही पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अद्याप या खून प्रकरणातील संशयितांची नावे निष्पन्न झालेली नाहीत.


Back to top button
Don`t copy text!