डिएड कॉलेज चौकातुन गिरवी नाक्याकडे जाणारी अवजड वाहतुक सुध्दा होणार सुलभ; श्रीमंत रामराजेंच्या हस्ते भुमिपुजन संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑगस्ट २०२२ । फलटण । फलटण शहरातून जाणाऱ्या रिंग रोडवर जुने डीएड कॉलेज चौक पासुन लाकडी चौकाकडे जाणार्या रस्त्याचा चढ कमी करण्याच्या कामाचा शुभारंभ राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.

सदर कामाचे भूमीपूजन व कामाचा शुभारंभ श्रीफळ वाढवून व टिकाव टाकून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, माजी नगरसेवक सुदाम मांढरे (अप्पा), किशोर नाईक निंबाळकर, अजय माळवे, दादासाहेब चोरमले, हेमंत बोरावके, डॉ. प्राश्वनाथ राजवैद्य यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना (जिल्हास्तर) सन २०२१ – २२ मधून या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून ९२ लाख २८ हजार ५६७ रुपये खर्च मंजुर करण्यात आला आहे. सदर कामाची निविदा प्रक्रिया सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली असल्याचे यावेळी आमदार दिपकराव चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

ईगल कन्स्ट्रक्शन यांना सदर कामाची वर्क ऑर्डर देण्यात आली असून ६ मीटर रुंदीने सुमारे दीड मीटर पर्यंत खोल खोदकाम करुन डी. एड. चौक – डॉ. बोरावके बंगला – लाकडी चौक या मार्गाचे खोदकाम पूर्ण झाल्यानंतर खडीकरण, डांबरीकरण करुन क्रांतिसिंह नाना पाटील चौकाकडून येणारी सर्व प्रकारची वाहने सहजरित्या पुढे जाण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सदर रस्त्याचा चढ कमी करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

फलटण नगर परिषद विशेष सभेत या कामाला आर्थिक व प्रशासकीय मंजूरी देण्यात आली असून त्यानंतर पुढील सर्व प्रक्रिया पूर्ण करुन आज या कामाचा प्रत्यक्ष शुभारंभ करण्यात आला आहे.

यावेळी युवा नेते राहुल निंबाळकर यांनी सदरील कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते.


Back to top button
Don`t copy text!