दैनिक स्थैर्य । दि.०३ डिसेंबर २०२१ । वाई । बुधवारी रात्री सुरू झालेल्या पावसामुळे देगाव (ता वाई) आणि खटाव तालूक्यात तालूक्यात रात्रभर झालेल्या पाऊसने पिकांचे नुकसान केलेच शिवाय दोन घटनांमध्ये तब्बल ३५ बकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मेंढपाळ आणि शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे.
भिरडाची वाडी, भुईंज (ता वाई) येथील शिवाजी शंकर धायगुडे हे मेंढपाळ बकऱ्यांचा कळप घेऊन देगाव येथील शिवारात थांबला होता. बुधवारी रात्री आणि गुरुवारी पहाटे अचानक पावसाचा जोर वाढला. पाऊस आणि हवामानात वाढलेल्या गारट्यामुळे बकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी आठ वाजता एकूण २० बकऱ्यांचा मृत्यू झाल्याने व दहा अंत्यवस्थ असल्याने भीतीचे वातावरण तयार झाले आहे.बकऱ्या शेडमध्ये बांधल्या असताना रात्री मुसळधार पाऊस आणि पहाटेची थंडी यामुळे गोठ्यात बांधलेल्या वीस बकऱ्यांचा मृत्यू झाल्याची वाईट घटना घडली.घटनेची माहिती वाईचे तहसीलदार रणजित भोसले यांना मिळताच त्यांनी शासकीय यंत्रणा घटनास्थळी पाठवली. ते स्वतः भेट देण्यासाठी घटनास्थळाकडे निघाले आहेत.
मेघलदरे (ता खटाव) गावात घडला. दुष्काळी भाग सजमल्या जाणाऱ्या या मेघलदरे गावातील कुमार मदने नावाच्या शेतकऱ्याच्या बकऱ्या घराशेजारी असलेल्या मोकळ्या जागेत बांधल्या होत्या. मध्यरात्री ढगफुटीसारखा झालेल्या पाऊसाने बाहेर बांधलेल्या १५ बकऱ्या भिजल्या आणि त्यांचा गारठून मृत्यू झाला. मदने कुटुंबाने एवढ्या पाऊसातही बकऱ्या वाचण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी झाला.