
स्थैर्य, सातारा, दि. 18 : जिह्याच्या पश्चिम भागामध्ये मान्सूनने काल दुपारपासून हजेरी लावली आहे. आज सकाळपासून तर वाई, जावली, पाटण आणि सातारा तालुक्यात जोरदार एन्ट्री मारली आहे. दिवसभर सरीवर सरी सुरु होत्या. कोरेगाव, खटाव व माण या तालुक्यात पावसाने दडी मारली होती.
दुष्काळी तालुक्यात बळीराजा पावसाच्या प्रतिक्षेत होता. तर पश्चिम भागात दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. सातारा शहरात दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती. काल दिवसभर व सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरी 19 मिलीटर पावसाची नोंद झाली होती.कोरोनामुळे जिल्हावासियांवर अगोदरच धडधड सुरु आहे. त्यातच पावसाने मात्र यावर्षी वेळेवर आगमन केल्याने घरोघरी असलेल्यांनी शेती कामांमध्ये लक्ष् घातले. गेल्या मान्सूनने गेल्या तीन चार दिवसांपासून जिह्यात सुरुवात केली आहे. मात्र, काल दुपारपासून दमदारपणे पावसाला प्रारंभ झाला. दुपारी 3 वाजल्यानंतर पावसाने सातारा तालुक्यात पश्चिम भागासह पावसाने आगमन केले. रात्री उघडीप घेतल्यानंतर सकाळी 10 वाजता पुन्हा प्रारंभ केला. जावली तालुक्यात मेरुलिंग परिसरात चांगलीच हजेरी लावली होती. सातारा शहरात पोवई नाका, समर्थ मंदिर, शनिवार पेठ या भागात पावसाने बाजार पेठ ठप्प झाली होती.राधिका रोड परिसरात पावसाने नाल्याचे पाणी रस्त्यावर आले होते. करंजे ते भुविकास बँक परिसरापर्यंत रस्त्याकडेचे चाललेल्या खोदकामामुळे चिखल झाला होता. पडत असलेल्या पावसाने नागरिकांनी बाहेर पडणेच टाळले होते. कास परिसरात पावसाची रिपरिप सुरु होती. जिह्यात 19.38 मिलीमीटर पाऊस झाला.सातारा तालुक्यात 17.38, जावली तालुक्यात 26.48मिलीटमीटर), पाटण 30.64मिलीटमीटर), कराड 15.85मिलीमीटर), कोरेगाव 17.67 मिलीमीटर), खटाव8.80मिलीमीटर), माण 2.14मिलीमीटर), फलटण 6.00मिलीमीटर), खंडाळा 9.95मिलीमीटर), वाई 16.14मिलीमीटर), महाबळेश्वर 58.38मिलीमीटर), जिह्यात 19.38मिलीमीटर पावसाची नोंद झाली.